Maharashtra Electronic Vehicle Policy 2021 | महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक वाहन पोलिसी 2021

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज नवीन Maharashtra Elecronic Vehicle Policy 2021 जाहीर केली आहे. इंधनाच्या वाढत्या किमती, जागतिक तापमानवाढ आणि पर्यावरणाचा होणार ह्रास लक्षात घेता भविष्यात Electronic Vehicle ला पर्याय नाही हे जाणवू लागले आहे.


महाराष्ट्राची पुढील काही वर्षातील Electronic Vehicle(EV) मधील उद्दिष्ट आणि लोकांना EV वापरण्यासाठी प्रोत्साहन या दोन्ही साठी Maharashtra Electronic Vehicle Policy 2021 महत्वपूर्ण आहे.


Maharashtra Electronic Vehicle Policy 2021
Maharashtra Electronic Vehicle Policy 2021.


Maharashtra Electronic Vehicle Policy 2021 उद्दिष्टे:


  • 2025 पर्येंत राज्यातील एकूण वाहनांच्या 10 टक्के EV गाड्याचे रजिस्ट्रेशन करून घेणे.

  • 2025 पर्यत प्रवाशी वाहतूक वाहनाच्या 25 टक्के गाड्या चा Electrification करणे.

  • महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या(MSRTC) सध्या अस्तित्वात असणाऱ्या वाहनाच्या 15 टक्के गाड्या Electronic Vehicle मध्ये रूपांतरित करणे.

  • Electronic Vehicle च्या वार्षिक उत्पादनक्षमता च्या बाबतीत महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकाचे राज्य बनवणे.

  • 7 प्रमुख शहरी भाग आणि 4 राष्ट्रीय महामार्ग वर 2375 सरकारी आणि निमसरकारी Charging Stations उभारणे.

  • April 2022 नंतर खरेदी केल्या जाणाऱ्या सर्व सरकारी गाड्या सर्व EV असतील.

  • E commerce Company, Food Delivery Company, Logistics Company कडे 2025 पर्यत 25 टक्के गाड्या EV असाव्यात.

  • सोसायटी मध्ये Charging Station उभारणाऱ्यांना मालमत्ता करामध्ये सूट देण्यात येईल.

  • सर्व प्रकारच्या EV ना Road Tax माफ असेल.


  • सर्व प्रकारच्या EV ना वाहन नोंदणी (Registration Charge) माफ असेल.


Electronic Vehicle खरेदी साठी ग्राहकांना सूट:

  • दुचाकी वाहन     - 29,000 - 44,000 सूट.
  • तीन चाकी वाहन - 57,000 - 92,000 सूट.
  • चार चाकी वाहन - 1,75,000 - 2,75,000 सूट.


Charging Station उभारण्यासाठी सूट:

  • Slow Power Charging Station - 10,000 
  • Moderate Fast Power Station - 5,00,000

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

If You Have Any Doubt,Please Let Me know