भारतीय नौसेना साठी महत्वकांक्षी Project75i ला मंजुरी | DAC Cleard 6 Submarine Under Project 75i [2021].

गेल्या काही वर्षांपासून नौसेना Project 75 i साठी प्रयत्नशील होती. आज या महत्वकांक्षी प्रोजेक्ट ला मान्यता मिळाली आहे. या अंतर्गत 6 पाणबुडी भारतीय नौसेना ला भेटणार आहेत. The DAC approved issue of RFP for construction of six Conventional Submarines under Project P 75 (I) under the Strategic Partnership. 


आज DAC ( Defence Acquisition Council) ची बैठक रक्षा मंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यामध्ये भारतीय नौसेना साठी 6 Submarine ची बांधणी Project 75 i अंतर्गत केली जाईल यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या Project साठी 43,000 करोड रुपये राखीव ठेवले गेले आहेत.

काय आहे Project-75 i.

Project 75 i मधील "i" म्हणजे India असा याचा अर्थ आहे. याआधी Project 75 अंतर्गत 6 Submarine ची बांधणी माझगाव डॉक येथे केली जाते आहे. याचं प्रोजेक्ट च पुढचं चरण म्हणजे Project 75 i आहे. या नवीन चरणामध्ये जास्तीत जास्त स्वदेशी साहित्य वापरण्यावर भर देणार येणार आहे.

कसा असेल Project 75 i.

ज्या Submarines बनवल्या जाणार आहेत त्या Strategic Partnership Route च्या माध्यमातून बनवल्या जाणार आहेत. यामध्ये दोन भारतीय कंपन्या माझगाव डॉक लिमिटेड आणि L&T असतील आणि 5 पाणबुडी तयार करणाऱ्या कंपन्या असतील.

भारतीय नौसेना 5 कंपन्या च्या पाणबुडी Test करतील आणि यापैकी एका कंपनी ची निवड करेल, त्या कंपनी ला माझगाव डॉक लिमिटेड किंवा L&T यापैकी एक बरोबर पाणबुडी निर्मिती चा करार करावा लागेल.

याआधी Project-75 अंतर्गत 6 Submarine चं Contract French Naval Group ला देण्यात आलं होतं. आणि Submarine ची निर्मिती माझगाव डॉक येथे केली गेली होती.

काय आहे Strategic Partnership Model.

  • यानुसार विदेशी कंपनी भारतीय कंपनी सोबत करार करून पाणबुडी ची निर्मिती भारतात करेल,
  • यानुसार पाणबुडी निर्मितीतील तंत्रज्ञान दिले जाईल (Transfer Of Technology),
  • भारतात तयार केल्यामुळे संरक्षण साहित्य निर्मिती भारत आत्मनिर्भर होऊ शकेल आणि भविष्यातील स्वदेशी साहित्य निर्मिती मध्ये याची मदत होईल.

कोणत्या 5 कंपनी सामील होणार आहेत.

  • French Naval Group (France)
  • Rubin Design Bureau (Russia)
  • Thyssenkrupp (Germany)
  • Navantia (Spain)
  • Daewoo (South Korea)


Project75 i ची खासियत.

  • या Submarine Disel Electric Type च्या असतील.
  • यावर Independent Air Propulsion असेल यामुळे जास्त काळ पाण्याखाली राहू शकते.
  • या Submarine चा आवाज खूप कमी येत असल्याने हि शत्रू जहाज किंवा पाणबुडीकडून Detect होण्याची शक्यता कमी आहे.

भारतीय महासागर प्रदेशात चिनी Submarine आणि जहाजावर नजर ठेवण्यासाठी पाणबुडी ची गरज आहे, भारताला आपली समुद्री सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी 24 पाणबुडी ची गरज आहे पण सध्या 15 पाणबुडी कार्यरत आहेत .Submarine ची संख्या वाढवण्यासाठी Project 75 i मदतगार सिद्ध होईल.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या