स्वदेशी Aircraft Carrier INS Vikrant च्या समुद्री चाचणीस सुरुवात | INS Vikrant Begins Sea Trials 2021

INS Vikrant Sea Trials Started


भारतासाठी आणि भारतीय नौसेना साठी आजचा दिवस खूप ऐतिहासिक आणि अभिमानाने भरलेला आहे. अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर स्वदेशी विमानवाहू जहाज (Aircraft Carrier) नौसेना मध्ये समील होण्यास तयार झाले आहे. यामुळे भारतीय नौसेना ची ताकद अनेक पटीने वाढेल.


INS vikrant Sea Trials Started


Key Points:

  • काय असतात Aircraft Carrier
  • काय आहे Project 71
  • INS Vikrant Timeline
  • INS Vikrant Specification
  • INS विक्रांत चे महत्व
  • सध्याचे Aircraft Carrier
  • भविष्यातील Aircraft Carrier

काय असतात Aircraft Carrier: 


नौसेना मध्ये असे काही जहाज असतात, ज्यावर फायटर जेट्स Operate करण्याची सुविधा असते, आकाराने मोठे असल्याकारणाने त्यावर एका Airforce Station मध्ये जेवढे Jets असतात तेवढे Jets वाहून नेण्याची क्षमता असते. याला आपण समुद्रातील चालते फिरते Airforce Base असाही आपण म्हणू शकतो.


भारतीय नौसेना मध्ये याआधी INS विराट, INS विक्रांत हे Aircraft Carrier वापरण्यात आले होते. कालांतराने त्यांना नौसेना मधून Retire करण्यात आले.


सध्या भारतीय नौसेना कडे एकमेव INS विक्रमादित्य नावाचे Aircraft Carrier आहे जे रशिया कडून घेण्यात आले होते.



INS विक्रमादित्य ,भारतीय नौसेना


काय आहे Project 71:


भारतीय नौसेना मधील विमानवाहू जहाजांनी नेहमीच आपले काम चोख पणे बजावले आहे. भविष्यातील आव्हानं आणि गरज लक्षात घेता आणखी Aircraft Carrier ची गरज भारताला भासत होती.


या प्रोजेक्ट अंतर्गत तयार होणाऱ्या जहाजाला IAC1(indigenous Aircraft Carrier-1) असं ही म्हणतात. 1971 च्या भारत पाकिस्तान युद्धात (बांगलादेश लिब्रेशन वॉर) INS विक्रांत ने केलेल्या अभूतपूर्व कारवाई मुळे नवीन जहाजालाही INS Vikrant हे नाव देण्यात आले.


INS Virat,भारतीय नौसेना

INS Vikrant Timeline:


  • 1999 मध्ये रक्षा मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांनी INS विक्रांत च्या Design and Development साठी परवानगी दिली.

  • 2001 - 32,000 Ton Aircraft Carrier चा Design तयार करण्यात आलं.

  • 2003 - Design Update करून 37,000 Ton असे करण्यात आले.

  • 2006 - 40,000 Ton असे Design Final करण्यात आले.

  • 2009 - रक्षा मंत्री A.K Antony यांनी कोचीन शिप यार्ड येथे जहाज बांधणी ची पायाभरणी केली.

  • मार्च 2011 मध्ये Gear Box च्या अडचणीमुळे Project Delay झाला

  • 2013 - Aircraft Carrier Launch करण्यात आलं.

  • 2015 - INS विक्रांत ला Undock करण्यात आलं.

  • 2020 - Basin Trials पूर्ण झाल्या.

  • 2021 - Sea Trials सुरू करण्यात आल्या.

  • 2022 मध्ये INS VIkrant भारतीय नौसेना मध्ये सामील करण्यात येईल.

2009 मध्ये बांधणी सुरू झाली त्यावेळी INS विक्रांत 2013 मध्ये Sea Trials पूर्ण करेल आणि 2014 मध्ये नौसेना मध्ये सामील होईल असे अपेक्षीत होते पण वेळोवेळी Technical Issue, साहित्याची आणि Funds ची कमी,Covid19  यामुळे हा Project Delay होत गेला.



INS विक्रांत launch 2013


INS Vikrant Specification: 

  • Weight - 40,000 Ton,
  • Length - 262 Meter,
  • Beam - 62 Meter,
  • Speed - 56 Km/Hr,
  • Range - 15,000 Km,
  • Crew - 196 Officers (Total-1449),
  • Project Cost - 23,000 करोड

 

INS विक्रांत वर Mig29K Fighter Jets, Kamov-31 Helicopters, MH-60R Multirole Helicopter, Advanced Light Helicopter कार्यरत असतील.


INS विक्रांत वर Short Takeoff आणि Arrested Landing असेल.



INS विक्रांत

याआधीचे Aircraft Carrier:


INS Virat 1961-1997(British Origin)

INS विक्रांत 1987- 2016(British Origin)

INS विक्रमादित्य 2013-आतापर्यंत(Russian Origin)


पुढील Aircraft Carrier:


INS विक्रांत (On Sea Trials)

INS विशाल (Planned)


INS विराट आणि INS विक्रमादित्य


INS विक्रांत चे महत्व:


भविष्यातील आव्हान लक्षात घेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांनी नौदल स्थापन करण्याचे आदेश दिले होते, म्हणून शिवाजी महाराज यांना नौदलाचे जनक म्हणतात.


भारतासमोर वाढती आव्हान चीन, पाकिस्तान कडून असणारा धोका, बदलत्या आंतराष्ट्रीय घडामोडी यामध्ये नौदल Strong असणे खूप गरजेचे आहे.


Aircraft Carrier कोणत्याही देशाची Military Operate करण्याची Capacity वाढवतात.


हिंदी महासागरात चीन चा वाढता प्रभाव कमी करण्यासाठी INS विक्रांत उपयोगी पडेल


सध्या चीन कडे 2 Aircraft Carrier आहेत (CV-16 Liaoning आणि CV-17 Shandong) तिसऱ्या Aircraft Carrier ची बांधणी सुरू आहे.


INS Vikrant लवकर Sea Trials Purn करेल आणि नौसेना मध्ये सामील होईल अशी अपेक्षा करूयात. 




टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

  1. आता मिळवा मोफत महाराष्ट्रातील व भारतातील सरकारी व खासगी नौकरी ची माहिती मोफत अधिक माहिती साठी भेट द्या.
    Naukri Kendra | नौकरी केंद्र

    उत्तर द्याहटवा

If You Have Any Doubt,Please Let Me know