अफगाणिस्तान मध्ये शांती साठी भारत - तालिबान मध्ये चर्चा | India - Taliban Talks [2021]

अमेरिका ने आतापर्यंत अफगाणिस्तान मध्ये तैनात असणाऱ्या 50 टक्के सेना माघारी बोलवल्या आहेत. सप्टेंबर 2021 पर्यंत संपूर्ण सेना मायदेशी बोलावली जाईल असे अध्यक्ष जो बाईडेन यांनी घोषणा केली आहे. अमेरिकी सैन्य माघारी गेल्यावर हा प्रदेश पुन्हा अस्थिर होऊ नये म्हणून भारत प्रयत्न करत आहे. India Taliban Talks.



अफगाणिस्तान चे भौगोलिक स्थान लक्षात घेता हा प्रदेश जगातील शांती साठी संपूर्ण जगासाठी आणि भारतासाठी खूप महत्त्वाचा आहे. अमेरिकन सैन्य मागे जाताच तालिबान पुन्हा अफगाणिस्तान वर कब्जा करण्याचा प्रयत्न करत आहे. नुकतेच 2 दहशतवादी हल्ले तालिबान कडून करण्यात आले आहेत.

दहशतवाद संपवण्याच्या दृष्टी ने American Lead NATO Forces अफगाणिस्तान मध्ये घुसल्या पण दोन दशके होऊन हे त्यांना पूर्णतः यश आले नाही. ओसामा बिन लादेन च्या मृत्यू नंतर दहशतवाद संपेल अशी अपेक्षा ही फोल ठरली. आता पाश्चिमात्य देशांना कळून चुकले आहे की फक्त ताकदीच्या बळावर या क्षेत्रात शांती आणणे अवघड आहे म्हणून या प्रक्रियेमध्ये तालिबान ला ही सामील करण्यात येत आहे.

तालिबान ला शांती समझोता मध्ये सामील करण्यासाठी अनेक देश प्रयत्न करत आहेत जसे की अमेरिका, रशिया, पाकिस्तान, चीन यात भारत ही आपले प्रयत्न करत आहे. अनेक वर्षांपासून चालू असलेल्या कुरघुड्या, आक्रमण, यामुळे अफगाणी जनता, अफगाण सरकार, आणि तालिबान यांचा पाश्चात्य देशावर विश्वास राहिला नाही. पण भारताबद्दल यांचा दृष्टिकोन सौम्य आहे.

अफगाणी जनतेचा भारतावर विश्वास:


भारत हा अफगाणिस्तान मधील सर्वात लोकप्रिय देश आहे. भारतीय सिनेमा, गाणी, Television Show आवडीने पाहिले जातात. भारताने बाकीच्या देशांप्रमाणे स्वतःचा फायदा न पाहता अफगाणिस्तान मध्ये पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर दिला. धरणे, शाळा, कॉलेज, हॉस्पिटल रस्ते भारताच्या मदतीने बांधले गेले आहेत. तसेच अफगाणिस्तान मधील संसदेची उभारणी भारताने केली आहे.

अफगाण सैन्याला अनेक वर्षे झाले सैन्य प्रशिक्षण भारत देत आहे. अफगाण विद्यार्थी ही शिकणासाठी भारताला पसंती देतात. यामुळे भारताबद्दल एक प्रेम आणि आदर ची भावना अफगाणी जनता आणि सरकार मध्ये आहे.

आतापर्यंत चर्चेतून झालेली फलनिष्पत्ती:

काही दिवसांपूर्वी काश्मीर प्रश्नावर तालिबान म्हणाले होते की, "काश्मीर हा भारताचा अंतर्गत प्रश्न आहे " याआधी अशी बाजू कधीही तालिबान ने घेतली नव्हती.

हा प्रदेश शांत राहणे हे सर्वांसाठी हितकारक आहे यासाठी भारताचे प्रयत्न आणि महत्त्व हे अनन्यसाधारण आहेत.लवकरच या प्रयत्नांना यश येवो.























टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या