भारतीय सेना च्या Trucks, Tanks, Artillery ची वाहतूक कमी खर्चिक आणि पटकन व्हावी म्हणून Dedicated Freight Corridor वर रणगाडे वाहतूक करून याची चाचणी घेण्यात आली. Army Hold Trial Run Of Train On Dedicated Freight Corridor 2021.
काल 14 जून 2021, नवी रेवारी ते नवी फुलेरा या मार्गावर आर्मी चे जड वाहन जस की Tanks, Heavy Duty Truck यांची रेल्वे वरून वाहतूक करण्यात आली. या चाचणी चा उद्देश Dedicated Freight Corridor वर आर्मी वाहनांची वाहतूक किती परिणामकारक आहे हे पाहणे होते.
चाचणी मागचा उद्देश:
भारत हा भौगोलिक दृष्ट्या मोठा देश आहे. माल वाहतुक जास्त करून रस्ते मार्गाने होते तसेच संरक्षण साहित्य निर्मिती देशात वेगवेगळ्या ठिकाणी केली जाते, या साहित्याची वाहतूक सीमावर्ती भागात लवकर व्हावी म्हणून रेल्वे वरून याच Transportation केलं जातं.
त्याचबरोबर एका एखाद्या भागात आपत्कालीन स्तिथी जस की पूर, वादळ, दंगल, आतंकवादी हल्ला झाला तर त्याठिकाणी Machinery, Equipment, Resources पटकन हलवता येतील याच्या उद्देशाने या चाचणी करण्यात आल्या आहेत.
काय असतात Dedicated Freight Corridor:
रस्तेवाहतूक किंवा रेल्वेवाहतून पटकन व्हावी म्हणून असे मार्ग तयार केले जातात ज्यावर फक्त ठराविक वाहने च चालतात. भारतात DFC हे रेल्वे वाहतुकीशी संबधीत आहेत ज्यावर फक्त मालवाहतूक केली जाते त्यासाठी रेल्वेमार्ग ही वेगळे तयार केले जातात,प्रवाशी वाहतूक या मार्गावरून होत नाही.
भारतातील Dedicated Freight Corridors:
भारतात सध्या दोन DFC वर काम चालू आहे
- Western Dedicated Freight Corridor - नवी मुंबई ते दिल्ली 1506 किलोमीटर
- Eastern Dedicated Freight Corridor - पश्चिम बंगाल मधील धनकुनी ते उत्तर प्रदेश मधील खुर्जा 1856 किलोमीटर
अजून 4 DFC विचाराधीन आहेत
- East-West DFC - 2000 KM , धनकुनी ते भुसावळ
- North-South DFC - 975 KM, विजयवाडा ते इतरसी
- East Coast DFC - 1115 KM, विजयवाडा ते खरगपूर
- Southern DFC - 892 KM, मडगाव ते चेन्नई
0 टिप्पण्या
If You Have Any Doubt,Please Let Me know