आंतरराष्ट्रीय योग दिवस 2021 | विद्यार्थ्यांसाठी योग चे महत्व | Importance Of Yoga For Students And Childrens 2021

आज 21 जून 2021,पूर्ण जगामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जात आहे. व्यक्तीला शरीराने आणि मनाने सुदृढ बनवण्याचे कार्य योग हजारो वर्षे झाले करत आहे. गेल्या काही दशकात योग ला आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक प्रभावी पद्धतीने मांडले जात आहे. त्याचीच एक फलप्राप्ती म्हणजे आंतरराष्ट्रीय योग दिवस. World Celebrates International Yoga Day 2021.


Points Covered:

  • आंतरराष्ट्रीय योग दिवस पार्श्वभूमी.
  • 21 जून दिवसाचे महत्व.
  • आंतरराष्ट्रीय योग दिवस 2021 ची Theme.
  • योग चे विद्यार्थ्यांसाठी फायदे.
  • मुलांना योग शिकवण्यामध्ये पालकांची भूमिका.

     *विद्यार्थी योग करताना

आंतरराष्ट्रीय योग दिवस पार्श्वभूमी:

2014 मध्ये संयुक्त राष्ट्र (United Nations) च्या सर्वसाधारण सभेमध्ये भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 21 जून आंतराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जावा म्हणून ठराव मांडला. ठराव मांडताना पंतप्रधान म्हणाले की "योग ही भारताने जगासाठी दिलेली एक अनन्यसाधारण भेट आहे".

या ठरावाला 177 देशांनी समर्थन दिले, जे आजपर्यंत संयुक्त राष्ट्र मध्ये सादर केलेल्या ठरावांपैकी सगळ्यात जास्त आहे. 2015 साली पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला गेला जात आहे. 2021 मध्ये साजरा केला जाणारा हा 7 वा आंतराष्ट्रीय योग दिवस आहे.

21 जून दिवसाचे महत्व:

21 जून या दिवसाला भौगोलिक दृष्ट्या खूप महत्व आहे. 21 जून हा दिवस उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस आणि सर्वात कमी रात्र असणारा दिवस आहे. 

21 जून या दिवशी पृथ्वी ही सूर्याकडे जास्त कललेली असते म्हणून  या दिवशी सर्वात मोठा दिवस पाहायला भेटतो.

जगातील अनेक देशांमध्ये या दिवसाचे वेगवेगळे महत्व अधोरेखित केले आहे.

याला Summer Solstice, Estival Solstice, Mid Summer असेही म्हणतात.

आंतरराष्ट्रीय योग दिवस 2021 ची Theme:

यावर्षी साजऱ्या केल्या जाणाऱ्या आंतराष्ट्रीय योग दिवसाची Theme असेल "Yoga For Well Being" किंवा "Yoga For Wellness"

2020 साली Covid 19 मुळे Theme होती "Yoga at Home Yoga with Family"

 *सियाचीन सीमावर्ती भागात भारतीय सेना चे जवान योग करताना.


योग चे विद्यार्थ्यांसाठी फायदे:

विद्यार्थ्यांचं शाररिक स्वास्थ्य सोबत मानसिक स्वास्थ्य ही खूप महत्त्वाचं आहे, खासकरून सध्याच्या लॉकडाऊन च्या काळात मुलांना बाहेर पडता येत नाही, बाहेर खेळण्यावर बंधन आहेत या परिस्तितीत योग मुलांना मानसिक दृष्ट्या सुदृढ बनवण्यामध्ये खूप मदतगार सिद्ध होऊ शकते.

  • शरीरातील लवचिकता वाढते.
  • एकाग्रता वाढते, लक्ष विचलित होत नाही.
  • मन आणि शरीर यामध्ये Coordination तयार होते.
  • आत्मविश्वास वाढतो.
  • तणाव कमी होतो.
  • स्मरणशक्ती वाढते.
  • शरीर समतोल राखले जाते.
  • विचारांमध्ये Clarity येते.

मुलांना योग शिकवण्यामध्ये पालकांची भूमिका:

पालकांनी मुलांच्या शाररिक विकासाबरोबरच मानसिक विकासाकडे ही लक्ष देणे गरजेचं आहे. अभ्यासाला ,खेळण्याला वेळ देण्याबरोबरच अर्धा तास योग साठी देणे ही तेवढेच महत्वाचे आहे.

मुलांमध्ये होणारी चिडचिड, हट्ट हे कमी करण्यासाठी त्याचसोबत आपल्या सभोवताली असणाऱ्या परिस्थिती ची जाणीव होण्यासाठी योग मोलाची भूमिका बजावत आहे.

पालकांनी मुलांना योग ,ध्यान करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे त्याच सोबत स्वतः ही त्यांच्या सोबत योग, प्राणायाम, ध्यान केले तर मुलांनाही त्याची गोडी लागते .

आपण सर्वांनी योग दिवसाचे औचित्य साधून योग करण्यास सुरुवात करावी आणि आपल्या मित्र मैत्रीण यांनाही या कार्यात सहभागी करून घ्यावे.

आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या शुभेच्छा.









टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या