Kargil Vijay Diwas | कारगिल विजय दिवस 2021

 Kargil Vijay Diwas 

कारगिल विजय दिवस 2021


कारगिल युद्धाला आज 22 वर्ष पूर्ण झाली आहेत. 26 जुलै ला भारताने कारगिल युद्ध  जिंकल्याची घोषणा केली, म्हणून हा दिवस Kargil Vijay Diwas म्हणून साजरा केला जातो. आज ही हे युद्ध अतुलनीय शौर्य, प्रेरणादायी गोष्टी ने भरलेले आहे. Kargil VIjay Diwas 2021.

Kartil Vijay Diwas
India Celebrates 22nd Kargil Vijay Diwas


Key Points:

 • कारगिल युद्धाची पार्श्वभूमी.
 • कारगिल युद्धाची सुरुवात.
 • Operation Vijay ऑपरेशन विजय.
 • Operation Safed Sagar ऑपरेशन सफेद सागर.
 • कारगिल युद्धातील काही शौर्यवीर.
 • शौर्यवीरांचे प्रेरणा देणारे शब्द.


कारगिल युद्धाची पार्श्वभूमी:


 • भारत पाकिस्तान स्वतंत्र झाल्यापासून सियाचीन (उत्तर काश्मीर) या भागात दोन्ही देशांनी सैन्य तैनातकेले नव्हते. कारण हा प्रदेश अतिशय प्रतिकूल असल्यामुळे तिथे टिकून राहणे कठीण होते.

 • 1971 च्या भारत पाकिस्तान युद्ध (Bangladesh Liberation War) नंतर पाकिस्तान सियाचीन मध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी या प्रदेशात आपला Control असावा म्हणून भारतीय सेना ने"ऑपरेशन मेघदूत" सुरू केले आणि 1984 मध्ये सियाचीन वर तिरंगा झेंडा फडकवला.

 • सियाचीन चा बदला घेण्यासाठी आपण ही काश्मीर मधील काही टेकड्या वर ताबा मिळवू आणि लडाख ला काश्मीर पासून तोडून भारताला सियाचीन सोडण्यासाठी दबाव आणणे, त्याचबरोबर काश्मीर प्रश्न आंतराष्ट्रीय स्तरावर आणण्यासाठी पाकिस्तान ने कारगिल चा प्लॅन (Operation Badr) तयार केला.

कारगिल युद्धाची सुरुवात:


 • या युद्धामध्ये पाकिस्तान ला आपली Involvement दाखवायची नव्हती घुसखोरांच्या वेशात त्यांनी पाकिस्तान सैन्यातील 5000 जवानांना पाठवले. 

 • भारतातील एक मेंढपाळाने कारगिल मधील टेकडीवर काही बंधुकधारी माणसे असल्याचे भारतीय आर्मी ला कळवले.

 • सुरुवातीला आर्मी ला वाटले की काही घुसखोर असतील, पण जसे जसे गुप्तहेरांच्या खबर आल्या त्यावेळी हे Confirm झाले की हे घुसखोर नसून पाकिस्तानी सैन्य आहे. 

 • त्यावेळी भारतीय सेना ने या टेकड्या पुन्हा एकदा Capture करण्यासाठी "Operation Vijay" सुरू केले.

Operation Vijay ऑपरेशन विजय:


 • पाकिस्तान ने कब्जा केलेले टेकड्या परत घेणे इतके सोपे नव्हते, कारण पाकिस्तानी सैन्य टेकड्यावर उंचीवर होते आणि भारतीय आर्मी ला खालून वर टेकडी वर जावे लागत असे.

 • युद्धामध्ये एक नियम असा आहे की जो उंचीवर असतो, त्याला जास्त फायदा असतो कारण उंचीवरून खाली लक्ष ठेवणे हे सोपे जाते. उंचीवरून कोणालाही निशाणा बनवणे सोपे असते.

 • भारतीय सेना ने काही ठिकाणी कठीण चढाई करून टेकड्या Capture केल्या. भारतीय Bofors तोफा ने आपलं काम चोख पार पाडले. आणि कारगिल मधील टेकड्या भारताने जिंकल्या


Operation Safed Sagar ऑपरेशन सफेद सागर:


 • कारगिल च्या टेकड्या Capture करण्यासाठी भारतीय वायू सेना ला ही पाचारण करण्यात आल, त्याला Operation Safed Sagar असे नाव देण्यात आलं.

 • ज्या ठिकाणी सेना च्या जवानं जाणं शक्य नाही किंवा जास्त धोका आहे तिथे भारतीय वायू सेना ची Fighter Jets आणि Helicopters वापरण्यात आले.

 • वायू सेना ने टेकड्यावर Rockets, Missiles आणि Bomb हल्ले करून पाकिस्तानी सैन्याचा पराभव केला.


शौर्यवीरांचे प्रेरणा देणारे उद्गार:


 • आलो तर तिरंगा फडकवून येणार, नाही तर तिरंगा पांघरून येणार- कॅप्टन विक्रम बतरा.

 • भारतमातेसाठी कर्तव्य पार पडण्याआधी मृत्यू आला तर मी मृत्यू ला ही हरवले- कॅप्टन मनोज कुमार पांडे.


कारगिल युद्धातील काही शौर्यवीर.


 • कॅप्टन विक्रम बतरा.
 • कॅप्टन मनोज कुमार पांडे.
 • कॅप्टन N. केंगुरुसू.
 • ग्रॅनडीएर योगेंद्र सिंग यादव.
 • रायफलमन संजय कुमार.
 • नाईक दिघेन्द्र कुमार.
 • मेजर विकास गुप्ता.
 • कर्नल सोनम वांगचूक.
 • मेजर राजेंद्र सिंग अधिकारी.
 • कॅप्टन अनुज नायर.
 • मेजर पद्मपाणी आचार्य.
 • लेफ्टनंट केईशिंग नॉनगरूम.


या शौर्यवीराच्या शौर्याला सलाम

जय हिंद.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या