Zika Virus Found In India
Zika Virus Symptoms, Treatment,Prevention.
भारतात दुसरी कोरोनाची लाट ओसरली असून तिसरी लाट येण्याच्या तयारीत असतानाच, अजून एक व्हायरस ने आपलं डोकं वर काढलं आहे, तो म्हणजे Zika Virus. सध्या याचे 13 रुग्ण केरळ राज्यात सापडले आहेत आणि एका गरोदर महिलेचा मृत्यू झाला आहे. योग्य काळजी घेतली नाही तर Mucormycosis सोबत Zika Virus ला ही भारताला तोंड द्यावे लागणार आहे.
 |
Zika Virus Found In India. |
काय आहे Zika Virus:
- Zika Virus सर्वप्रथम 1947 मध्ये युगांडा मधील Zika Forest मधील काही प्राण्यामध्ये आढळला होता, म्हणून या जंगलाच्या नावाने या Virus ला Zika Virus म्हणले जाते.
- माणसामध्ये सर्वप्रथम याचा प्रसार 1952 मध्ये दिसून आला.
- 2015 मध्ये ब्राझील मध्ये याचा प्रादुर्भाव झाला होता आणि आज पर्येंत 86 देशामध्ये आढळून आला आहे.
 |
Zika Forest In Uganda |
Zika Virus Transmission | झिका व्हायरस चा प्रसार कसा होतो:
- Zika Virus चा प्रसार मुख्यतः Virus ने Infect झालेल्या डासांच्या चावण्याच्या माध्यमातून होतो. Aedes Aegypti आणि Aedes Albopictus या प्रकारचे Zika Virus ने ग्रासित असलेले डास मनुष्यास लावल्यास त्याचा प्रसार मनुष्यात होऊ शकतो.
- Aedes प्रजातीचे डास Dengue, Chikungunya आणि Yellow Fever या आजारास ही कारणीभूत आहेत.
- गर्भवती महिलेकडून मुलांमध्येही याच प्रसार होतो.
- झिका व्हायरस ने ग्रासित झालेल्या व्यक्ती ने रक्तदान केल्यास प्रसार होऊ शकतो.
Zika Virus Symptoms | झिका व्हायरस ची लक्षणे:
- ताप,
- त्वचेवर लाल चट्टे,
- डोकेदुखी,
- सांधे आणि स्नायू दुःखी,
- डोळे येणे,
- Incubation Period 3-14 दिवस.
- 2-7 दिवसात लक्षण दिसू शकतात.
Effect Of Zika Virus Infection:
- झिका ने ग्रासित असलेले बरेच जण काही दिवसात बरे होतात,पण गर्भवती महिलांसाठी आणि जन्मणाऱ्या आपत्यासाठी धोकादायक ठरू शकतो.
- गर्भवती महिला Zika Virus ने ग्रासित असेल तर जन्मलेल्या मुलांमध्ये Microcephaly आणि बाकीचे व्याधी दिसू शकतात.
- वेळेआधी प्रसूति होणे तसेच गर्भपात ही होऊ शकतो.
- Microcephaly जन्मलेल्या मुलांमध्ये डोक्याचा आकार लहान राहतो त्यामुळे मेंदू ची वाढ आणि विकास होत नाही.
 |
Microcephaly- Small Head Disorder Caused By Zika Virus |
Zika Virus Treatment :
- झिका व्हायरस वर कोणतीही एक उपचारपद्धती किंवा लस उपलब्ध नाही. रुग्णांना असणारी लक्षण (Fever,Joint Pain) पाहून उपचार केले जातात आणि रुग्ण काही दिवसात पूर्णपणे बरे होतात.
- उपचाराबरोबर विश्रांती आणि भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.
Zika Virus Prevention:
- Aedes प्रकारचे डास दिवसा चावतात रात्री ते चावत नाहीत त्यामुळे, डास चावू न देणे हा सर्वोत्तम प्रतिबंधात्मक मार्ग आहे.
- त्याच बरोबर गरोदर असणाऱ्या महिलांनी डास चावणार नाही याबद्दल विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
- डोकेदुखी अंगदुखी अशी लक्षण दिसल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
0 टिप्पण्या
If You Have Any Doubt,Please Let Me know