कोरोना चा सर्वात खतरनाक हायब्रीड व्हिएतनाम मध्ये आढळला आहे | Very Dangerous Corona Hybrid Varient Found In Vietnam | Vietnam Hybrid Strain | Vietnam Variant [2021]

 आजपर्यंत ज्या शहरांचे कोरोना प्रतिबंध मॉडेल म्हणून नाव घेतले जायचे त्यातील एक शहर म्हणजे व्हिएतनाम मधील 'हो ची मिन'. आज या शहरावर पुन्हा एकदा lockdown ची परिस्थिती आली आहे, याचे प्रमुख कारण म्हणजे व्हिएतनाम मध्ये सापडलेला नवीन Strain/Varient. Vietnams Very Dangerous New Hybrid Varient Found 2021.


नवीन Hybrid Varient सापडल्यामुळे व्हिएतनाम मधील हानोयी आंतराष्ट्रीय विमानतळ बंद करण्यात आले आहे. व्हिएतनाम शेजारील राष्ट्रांनी आपल्या सीमा बंद करायला चालू केल आहे.

काही दिवसांपूर्वी कोरोना प्रतिबंधक उपाययोजना केल्या बद्दल सिंगापूर, लाओस, थायलंड, तैवान यांचे नाव घेतले जायचे पण या नवीन Strain मुळे या भागात हा नवीन Varient पसरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नवीन Hybrid Varient हा भारतीय Delta Varient B.1.617.2 आणि UK Varient यांच्या Combination पासून तयार झाला आहे.

या Varient चा स्वतःची संख्या वाढवण्याचा काळ (Replication Time) बाकीच्या Varient पेक्षा जास्त आहे, त्याचबरोबर हवेमधून त्याचा प्रसार ही पटकन होतो म्हणून व्हिएतनाम देशाची चिंता वाढली आहे.

यातून बाहेर येण्यासाठी कोरोना प्रतिबंधक उपाययोजना करत लसीकरणावर ही भर देणे गरजेचे आहे असे आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

If You Have Any Doubt,Please Let Me know