Lockdown Stories :10-12 वर्षाच्या बहीण भावंडांनी दाखवलेल्या धैर्याची कहाणी .

कोरोना च्या काळात अनेक अनुभव आपल्या समोर आले. काही मन खिन्न करणारे होते, काही हताश करणारे आणि काही प्रेरणा देणारे ,आज आपण अशाच एका चिमुरड्या भावंडांची गोष्ट पाहणार आहोत जे आपल्याला नक्कीच काहीतरी शिकवून जातील.


पुण्याजवळील उरळीकांचन भागातील एक छोटंसं कुटुंब .या कुटुंबाची 3 लाडकी मुलं अजिंक्य (12), आरती (10) आणि अर्रनवी .आई राणी नर्सरी मध्ये कामाला जायची आणि वडील विठ्ठल व्यवासाय पहायचे. महामारीच्या परिस्तिथी मध्ये हे कुटुंब ही काळजीत असायचे त्याचबरोबर स्वतःची काळजी ही घेत होते.पण कोरोनाच्या काळात जे होऊ नये असे वाटत होते तेच झालं. घरातील तीन मोठी आधारस्तंभ सारखी माणसे आई ,वडील आणि आजी कोरोना ने पॉसिटीव्ह निघाले .त्यांना दवाखान्यात दाखल करावा लागलं. 

 दवाखान्यात घेऊन जाताना वडिलांचं मन अस्वस्थ होत, घरी फक्त आरती आणि अजिंक्य ही चिमुरडी आहेत, दुसरं कोणीच नाही ,मोठी मुलगी ही सासरी आहे ,या मुलांची काळजी कोण घेणार या प्रश्नाने ते चिंतेत दिसत होते.मोठी मुलगी अरणवी घरी बोलवावं तर लॉकडाऊन आहे ,बस सेवा चालू नाही,जिल्हा बंदी आहे.आपण काहीही करू शकत नाही हे समजता च काळजी पोटी आई वडिलांनी डोळे झाकले आणि प्रार्थना केली 'देवा पोरांकडे लक्ष दे'.

त्या रात्री आरती आणि अजिंक्य दोघाना झोप आली नाही.दोघे ही याच विचारात होते की 'आई वडील जवळ असते तर किती बार झाल असतं' . दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर दोघे घराबाहेर आले. गाई, शेळ्या, कोंबड्या त्यांच्या कडे पाहत होत्या, पण त्यातील कोणीही त्यांना पाहून हंबरडा फोडला नाही, किल-कीलाट केला नाही. कदाचित त्यांना ही या दोन चिमुरड्यासमोर असणाऱ्या यक्षप्रश्नांची कल्पना आली असावी.

आपल्यासमोर उभे असणाऱ्या गाई, शेळ्या, कोंबड्या या आपल्या दोघांवर अवलंबून आहेत याची जाणीव आरती आणि अजिंक्य यांना झाली .आणि त्यांनी घरातील कामे हाती घेण्यास सुरुवात केली. लहानपणापासून आई वडिलांना काम करताना पाहिलं होतं, तसे ते करण्याचा प्रयत्न करत होते, काही अडलं तरी वडिलांना फोन करून विचारायचे, वडिलांना ही हे ऐकून पोरांचं कौतुक करू वाटायचं. बहीण फोन करून दोघांना धीर द्यायची ,आज काय काय केलं याची विचारणा करायची आणि मुलं ही उत्साहाने सांगायची 'आज गाई ची धार काढली, कोंबड्या ना बाजरी टाकली, अंडी गोळा केली हे ऐकून बहिणी च्या डोळ्यात पाणी यायचे पण तिने कधी चिमुरड्यांना याची जाणीव होऊ दिली नाही, या काळात आपण त्यांच्या सोबत असायला पाहिजे असे तिला नेहमी वाटायचं पण परिस्तिथी तिच्या हातात नव्हती.

आई वडीलाविना जवळपास ही मुलं महिनाभर एकटी राहिली, स्वतःच स्वयंपाक करायचे, स्वतःचा सांभाळ करत 4 गाई, 10 शेळ्या, 40 कोंबड्या, 200 पिल्लं यांचाही सांभाळ केला. सध्या आई वडील बरे होऊन घरी आले आहेत ,पोरांनी केलेल्या कामाचा ,दाखवलेल्या धैर्याचा त्यांना अभिमान आहे. लॉकडाऊन अजून संपले नाही, बहिणीचा आज ही रोज फोन मुलांना असतो, ती रोज अनेक प्रश्न विचारते आणि अनेक नवीन प्रश्न तिच्या डोक्यात येत राहतात, हे नवनवीन प्रश्न कदाचित ज्यावेळी बहीण भावंडांची भेट होईल त्याच वेळी संपतील. 

एक वाक्य आहे जे या परिस्तितील अगदी तंतोतंत जुळत ते म्हणजे 'माणसाचं व्यक्तिमत्त्व हे कठीण काळात समोर येत' अजिंक्य आणि आरती यांनी लहान वयात दाखवलेलं धैर्य,संय्यम हे दोघांचं व्यक्तिमत दाखवतात. कठीण परिस्तिथी मधून जाताना त्यांनी कधीही याबद्दल तक्रार केली नाही,जे समोर आला त्याला हसत मुखाने सामोरे गेले.आणि असं धैर्य सगळ्यांना भेटो.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या