संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यासाठी 108 स्वदेशी संरक्षण साहित्यांची यादी जाहीर | Atmanirbhar Bharat In Defence Sector [2021]


भारताला लागणाऱ्या संरक्षण साहित्यापैकी 60-70 टक्के साहित्य आपण आयात करतो, आणि यासाठी अर्थसंकल्पातील मोठा निधी खर्च केला जातो.संरक्षण क्षेत्रात स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी आत्मनिर्भर भारत आणि Make In India अंतर्गत सरकारी आणि खाजगी संस्था काम करत आहेत.Ministry Of Defence Release Second Positive Indigenisation List Of 108 Items 2021.


Highlights

  • Positive Indigenisation List / Negative Import List म्हणजे काय.
  • कोणते असतील स्वदेशी 108 संरक्षण साहित्य.
  • Timeframe Of Implementation of Positive Indigenisation List.
  • Negative Import List / Positive Indigenissation List मुळे काय होईल.

काय आहे Positive Indigenisation List / Negative Import List :

जे संरक्षण साहित्य भारतात बनू शकते किंवा भविष्यात बनण्याच्या स्तिथी मध्ये आहे असे साहित्य बाहेरील देशातून आयात करण्यास बंदी म्हणजे Negative Import List. या आयात बंदीमुळे स्वदेशी संस्थाना संरक्षण साहित्य निर्माण करण्याची चालना मिळेल म्हणून याला Positive Indigenisation List असे ही म्हणतात.


कोणते असतील स्वदेशी 108 साहित्य :


याआधी Augest 2020 मध्ये पहिली यादी जारी करण्यात आली होती ,त्यामध्ये तोफ (Towed Artillery), Short Range Surface To Air Missile(SR-SAR), Cruize Missile, गस्ती नौका (Offshore Petrol Vessel) हे आयात करण्यास बंदी केली होती.


दुसऱ्या List प्रमाणे Complex Systems, Simulators, Sensors,Weapons and Ammunition हे असतील त्यात Helicopters, नौसेना जहाज (Next Gen Corvettes), Air Borne Early Warning System & Control (AEW&C), Medium Poswer Radar For Mountains ,मध्यम पल्ला जमिनीवरून हवेत मारा करणारी Missile  (Mid Range Surface To AIr Missile-MRSAR), Wheeled Armoured Platform (WhAP) हे असतील.


Timeframe Of implementation of Positive Indigenisation :

दुसऱ्या List मधील साहित्य डिसेंबर 2021 ते December 2025 काळात पूर्ण केले जाईल .2025 नंतर या लिस्ट मधील संरक्षण साहित्य बाहेरून घेण्यास पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे.

Negative Import List / Positive Indigenissation List मुळे काय होईल :


यामुळे देशात एक Defence Ecosystem तयार होण्यास मदत होईल, संरक्षण साहित्य निर्माण करणाऱ्या कंपन्या भारतात गुंतवणूक करतील, संरक्षण क्षेत्रात संशोधनामुळे World Class साहित्य भारत तयार करू शकेल आणि निर्यात ही करू शकेल, या क्षेत्रात काम करणाऱ्या सरकारी आणि खाजगी संस्था दोन्ही मिळून काम करतील, रोजगार निर्मिती होईल, साहित्य निर्मिती ची क्षमता वाढेल.


संरक्षण मंत्रालय 2nd list Notification


List Of 108 Positive Indigenisation Items Negative Import list

















टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या