सावधान !! चुकून दोन वेगळ्या कोरोना लशी लागल्या तर काय कराल?| एक Dose Covishield चा आणि दुसरा Covaxin चा तर काय होईल?|What If I Get 2 Different Corona Vaccine|Com-Cov2 Trials [2021]

 भारतात सध्या 3 कोरोना लसींना वापरण्याला परवानगी आहे.Covishield, Covaxin, sputnik v.अजून काही Vaccines ला काही दिवसात परवानगी दिली जाऊ शकते .मग प्रश्न असा येतो की,जर आपण दोन वेगवेगळ्या vaccines घेतल्या किंवा चुकून दिल्या गेल्या तर त्याचे परिणाम होतील ,त्याचे काही धोके होऊ शकतात का,आपलं शरीर या दोन लसींना कशाप्रकारे प्रतिसाद देईल.


Table Of Content.

  • Introduction
  • दोन लसींच्या वापराबद्दल विचार करण्याची गरज का आहे?
  • भारतात दोन लसींच्या वापराबद्दल सद्यपरिस्तिती.
  • शास्त्रज्ञांचे मत
  • Covishield + Covaxin
  • Com Cov 2 Trials
  • आपली जबाबदारी


Introduction

सध्या आपल्याकडे लसींचा तुटवडा भासत आहे, काही ठिकाणी Covishield लशीची कमतरता पाहायला भेटत आहे ,पण Covaxin हे पुरेशा प्रमाणात उपलब्द आहे, सर्वसामान्य लोक सुद्धा त्यांना कोणती लस दिली जात आहे, पहिला Dose आणि दुसरा Dose एकाच लसींचा आहे का याबद्दल विचारणा करत नाहीत.आतापर्यंत तरी भारतात 2 वेगळ्या Dose दिलेल्या बातम्या समोर आल्या नाहीत.पण असे न होण्याची शक्यता नाकारता येत नाही.


दोन लसींच्या वापराबद्दल विचार करण्याची गरज का आहे?

काही दिवसांपूर्वी Serum Institute चे CEO म्हणले होते की "अजुन  पुढील काही दिवस Covishield ची कमतरता जाणवू शकते",दुसरा Dose येईपर्येंत Covishield भेटेल की नाही हे खात्री ने सांगितले जाऊ शकत नाही. एखाद्या व्यक्ती ने एक लस एका देशात घेतली आणि दुसऱ्या देशात त्याला तीच लस भेटेल हे ही खात्री ने सांगता येत नाही.लसींच्या अभावी अनेक लोक विनालसीकरणाचे राहू नये,दोन्ही Dose मध्ये गरजेपेक्षा जास्त अंतर पडू नये म्हणून शास्त्रज्ञांनी एक वेगळ्या प्रकारच्या चाचण्या घेण्यास सुरुवात केली आहे ,त्याला Mix and Match Trials म्हणतात,यामध्ये दोन वेगळ्या प्रकारच्या लसी दिल्या जाऊ शकतात का? या वर संशोधन केले जाणार आहे.



भारतात दोन लसींच्या वापराबद्दल सद्यपरिस्तिती.

भारतात Serum Institute मध्ये तयार होणारी Covishield ही Adenovirus Viral Vector Vaccine या प्रकारची ही लस आहे,भारत बायोटेक निर्मित स्वदेशी लस Covaxin ही Inactivated Vaccine चे तंत्रज्ञान वापरून बनवण्यात आलेली लस आहे, नुकताच भारतात आलेली रशियाची Sputnik V ही सुध्दा Adenovirus Based Vaccine आहे.अमेरिकेच्या Covovax ला सुद्धा पुढील काही दिवसात भारतात वापरण्याची परवानगी भेटू शकते. इतके वेगळे प्रकारचे Vaccine देशात येणार आहेत तर कुठे तरी Mix and Match होण्याची शक्यता नाकारता येत नाही.



शास्त्रज्ञांचे मत.

शास्त्रज्ञांच्या मते दोन वेगवेगळ्या लसी देणे हे फायदेशीर ठरू शकते, कारण प्रत्येक लसींची कार्यपद्धती वेगळी आहे,त्यामुळे शरीर अजून चांगल्या प्रकारे कोरोना विषाणूसाठी प्रतिकारक्षम बनू शकते, फक्त एकच प्रकारचे Anti Bodies तयार करण्यापेक्षा सर्वसमावेशक आणि विस्तृत प्रतिकारक्षमता तयार करण्यासाठी याची मदत होईल. काही दिवसांपूर्वी च अमेरिकेच्या अग्रगण्य महामारी विशेषज्ञ Dr.Fauci म्हणाले होते की "भारतीय Covaxin हे जगात आढळणाऱ्या कोरोना विषाणू च्या 617 Mutations वर प्रभावी ठरलं आहे"



Covishield + Covaxin.

जर एक Dose Covishield चा आणि दुसरा Dose Covaxin चा दिला गेला तर कोरोना विषाणू आणि त्याच्या Mutation बद्दल चांगली प्रतिकारक्षमता आपल्या शरीरामध्ये तयार होऊ शकतो, पण सध्या तरी दोन वेगवेगळे लसी देणे ही एक Theory आहे ,Mix and Match च्या अजून चांगल्या पद्धतीने चाचण्या करण्यात आल्या नाहीत. चाचण्या नंतरच समजू शकेल की हे दोन वेगवेगळे Vaccine शरीरामध्ये कशा प्रकारे प्रतिसाद देतात.


                      *credit-Wion News

Com-Cov 2 Trials.

Mix and Match च्या चाचण्या करण्यासाठी सध्या United Kingdom मध्ये संशोधन चालू आहे त्याला Com Cov 2 study म्हणतात, यामध्ये Pfizer, Astrazanica, Moderna आणि Novovax यांचे वेगवेगळे Combinations test केले जाणार आहेत.या Study च्या Research Finding जून-जुलै महिन्या येणे अपेक्षित आहे, 



आपली जबाबदारी.

Com Cov2 चाचण्या चा Result येईपर्येंत आपल्याला कोणती लस दिली जाते आहे हे नक्की विचारून घ्या ,जेणेकरून चुकून दुसरा वेगळ्या लसींचा चा Dose लागला जाणार नाही. सरकारी guidelines च पालन करा, Mask, Social Distancing, आणि Sanitizer चा वापर करा. एक जबाबदार नागरिक बना, स्वतःची आणि परिवाराची काळजी घेत रहा.




धन्यवाद.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या