Buddha Purnima 2021। राजपुत्र ते भगवान बुद्ध होण्याचा प्रवास । बुद्ध पौर्णिमा 2021। वेसक Vesak 2021.

 जगाला शांती आणि प्रेमाचा संदेश देणाऱ्या बुद्धाची आज जयंती आहे. बुद्ध पौर्णिमा हा भगवान गौतम बुद्ध यांचा जन्मदिवस ,ज्ञानप्राप्ती आणि परिनिर्वाण दिवस. बुद्धाची शिकवण आजच्या जगात सर्वांसाठीच बुद्ध (बुद्धीचा धनी) होण्याचा मार्ग आहे. एक राजपुत्र ते संन्यासी आणि नंतर भगवान बुद्ध होण्याचा प्रवास आपण पाहणार आहोत. Buddha Pornima Celebration 2021  बुद्ध पौर्णिमा 2021.



लेखातील महत्वाचे मुद्दे

  • Introduction/ पार्श्वभूमी.
  • सिद्धार्थ बद्दल भविष्यवाणी.
  • सिद्धार्थ चे बालपण.
  • सिद्धार्थ च्या आयुष्याला कलाटणी देणारी घटना.
  • ज्ञानप्राप्ती साठी संन्यासी जीवन.
  • बुद्धाची शिकवण.

Introduction/ पार्श्वभूमी.

बौद्ध धर्माचे संस्थापक भगवान बुद्ध यांचा जन्म 563 BCE लुम्बिनी (नेपाळ) येथे झाला.बुद्धांचे नाव सिद्धार्थ गौतम असे होते. वडिलांचे नाव शुद्धोधन आणि आई महामाया. लहानपणीच आई चा मृत्यू झाला, त्यानंतर मावशी गौतमी यांनी त्यांचे पालन पोषण केले.सिद्धार्थ ला शाक्यमुनी (शक्यांचा मुनी) असेही म्हणले जायचे.वयाच्या 16 व्या वर्षी त्यांचा विवाह यशोधरा बरोबर झाला. राहुल हे त्यांच्या मुलाचे नाव होते.



सिद्धार्थ बद्दल केलेली भविष्यवाणी

सिद्धार्थ च्या जन्मानंतर असितमुनी यांनी भविष्यवाणी केली की ,"सिद्धार्थ हा बुद्ध म्हणजे बुद्धीचा धनी बनेल".आपला मुलगा भविष्यात काय बनेल हे जाणून घेण्यासाठी वडिलांनी 8 ज्योतिष तज्ज्ञ बोलावले , त्यातील 7 जण म्हणले की "एकतर सिद्धार्थ चक्रवर्ती राजा होईल जो जगावर राज्य करेल किंवा तो संन्यासी होईल किंवा धर्म प्रवर्तक बनेल"

8 वे ज्योतिष तज्ज्ञ कौडिण्य खात्री ने म्हणले की "सिद्धार्थ ऐश आराम सोडून संन्यासी जीवन जगेल,आणि नवीन धर्माची स्थापना करेल". आणि झालं ही असंच.


सिद्धार्थ चे बालपण.

तज्ज्ञांची भविष्यवाणी ऐकून वडील शुद्धोधन व्याकुळ झाले ,त्यांना आपला मुलगा संन्यासी भिक्षु जीवन जगेल हे त्यांच्या पचनी पडत नव्हते म्हणून, लहानपणापासून सिद्धार्थ ला अशी कोणतीही गोष्टसमोर येऊ दिली नाही त्यामुळे त्यांचा मनपरिवर्तन होईल, आणि त्याने संन्यासी जीवनाकडे वळू नये म्हणून ,त्याला सर्वप्रकारची प्रलोभने दिली गेले आणि आणि सिद्धार्थ त्यामध्ये अडकले ही .त्यांना भोग, विलास हेच जीवन आहे असे वाटू लागले होते. पण काही दिवसातच सिद्धार्थ ला खऱ्या आयुष्याची जाणीव होणार होती.


सिद्धार्थ च्या आयुष्याला कलाटणी देणारी घटना.

सिद्धार्थ ला बाहेरचे जग कसे आहे हे कळू नये म्हणून वडिलांनी खूप प्रयत्न केले ,पण एके दिवशी ते त्यांचा मित्रं छंदर बरोबर राजमहाल मधून बाहेर आले .त्यावेळी त्यांनी दारिद्र्य पाहिले, प्रेतयात्रा पहिली,एक वृद्ध व्यक्ती आजारी व्यक्ती पहिला, आजपर्यंत त्यांनी हे कधीही पाहिले नव्हते. वृद्धावस्था ही जीवनातील अटळ सत्य घटना आहे हे समजल्यावर त्यांचे मन खिन्न झाले. आपण जे जीवन जगत आहोत ते खरे जीवन नाही असे त्यांना वाटू लागले.आयुष्यातील सत्य जर असे असेल तर त्यातून मुक्ती मिळवण्यासाठी संन्यासी जीवन जगले पाहिजे असे त्यांना वाटू लागले. जीवनातील सत्य, ज्ञान काय आहे हे जाणून घेण्यासाठी घर, संसार, मोह, माया मधून सन्यास घेण्याचे ठरविले.


ज्ञानप्राप्ती साठी संन्यासी जीवन.

संन्यासी जीवनात सिद्धार्थ ला गुरू आलार कलाम आणि गुरू उतकराम पुत्र यांचे मार्गदर्शन भेटले. त्यांच्या कडून योग आणि ध्यान यांचे शिक्षण भेटले. तपस्या करताना त्यांना समजले की अन्न, पाणी त्याग करून प्राण सोडण्यापेक्षा काही तरी मधला मार्ग शोधला पाहिजे, सिद्धार्थ चे असे मत होते की "कोणत्याही गोष्टी चा अतिरेक करण्यापेक्षा योग्य उपयोग करून घ्यावा", म्हणून त्यांनी ज्ञान प्राप्ती साठी 'मध्यममार्ग' निवडला.

बिहार मधील गया या ठिकाणी सिद्धार्थ पिंपळाच्या वृक्षाखाली (बोधी वृक्ष) ध्यान करत असत, 6 वर्षाच्या कठोर तपस्येनंतर त्यांना ज्ञानप्राप्ती ची अनुभूती झाली, यावेळी सिद्धार्थ एक सामान्य संन्यासी व्यक्ती बुद्ध(बुद्धीचा धनी) झाला .


बुद्धाची शिकवण.

बोधी वृक्षाखाली बुद्धांना जे ज्ञान प्राप्ती झाली त्याचा प्रचार करण्यास ,लोकांना ज्ञान सांगण्यास सुरुवात केली .गौतम बुद्धांची शिकवण 'चार आर्यसत्य' आणि 'आठ आर्यमार्ग'(अष्टांगमार्ग) मध्ये सांगितली आहे.हि शिकवण सर्वानी मन लावून केली तर कोणीही बुद्ध बनू शकतो असे स्वतः भगवान गौतम बुद्ध म्हणायचे .

चार आर्यसत्य

  • दुःख आर्यसत्य - दुःख म्हणजे एक आजार आहे.
  • दुःख समुदाय आर्यसत्य - दुःखाचे कारण.
  • दुःख निरोध आर्यसत्य - दुःखाचा विरोध करणे.
  • दुःख निरोधगामीनी पतीपदा आर्यसत्य - दुखापासून मुक्त होण्याचा मार्ग.

आठ अष्टांगमार्ग

  • सम्यक दृष्टी - अंधविश्वास आणि भ्रम मुक्त दृष्टी.
  • सम्यक संकल्प - योग्य आणि उच्च विचार.
  • सम्यक वाचा - सत्यआणि दयेने भरलेली निष्कपट वाणी.
  • सम्यक कर्मांत - प्रामाणिक कर्म.
  • सम्यक अजीविक - कोणाला दुःख न देणे.
  • सम्यक व्यायाम - स्वतःवर आणि शरीरावर ताबा.
  • सम्यक स्मृती - जागृत आणि सावध मन.
  • सम्यक समाधी - सखोल चिंतन करणे.

 बुद्ध पौर्णिमा च्या हार्दिक शुभेच्छा.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या