- अनेक दिवसापासून सोशल मीडियावर ज्वारीच्या भाकरी चे महत्व ही पोस्ट व्हायरल होत आहे यामध्ये chapati or bhakri for diabetes हा टॉपिक सुद्धा cover केला होता,या लेखामधून मधुमेह असणाऱ्यांच्या मनातील chapati or bhakari या शंकाच पूर्णपणे निरसन होणार आहे ,चला तर मग सुरू करूयात.
- Topic covered
- चपाती भाकरी छोटासा इतिहास
- चपाती भाकरी मधील अन्नद्रव्य घटक
- Glycemic index
- चपाती भाकरी चा GI आणि blood glucose वर परिणाम
- गव्हाची चपाती आणि Gluten
- गव्हाची चपाती कोणता व्यक्ती खाऊ शकत नाही
- Conclusion
- चपाती भाकरी छोटासा इतिहास
भारतीय संस्कृतीमध्ये हजारो वर्षापासून गहू, ज्वारी,बाजरी,तांदूळ खाल्ले जात आहेत. गहू तांदूळ ही आहार पद्धती मधील प्रमुख तृणधान्ये आहेत आणि वरील धान्याचे यांचे गुणधर्म व वैशिष्ट्ये ही बऱ्यापैकी सारखेच आहेत.
पण गेल्या काही वर्षापासून गव्हाबद्दल लोकांच्या मनामध्ये अनेक प्रकारचे गैरसमज जाणून बुजून निर्माण केले जात आहेत जस की chapati is not good for diabetes यामध्ये सर्वात मोठा वाटा फूड प्रॉडक्ट कंपन्यांचा आहे,diabetes च्या भीती खाली अनेक पदार्थ विकले जातात जस की sugar free, oats,gluten free बिस्कीट आणि बरंच काही.
- चपाती भाकरी मधील अन्नद्रव्य घटक
मधुमेह असणाऱ्या रुग्णांना त्यांच्या आहारातील कार्बोहायड्रेट म्हणजेच कर्बोदके कमी करण्याचा सल्ला दिला जातो, वरील chart चा विचार केला तर कार्बोदकाची मात्रा प्रति 100 ग्रॅम गव्हामध्ये 72 gm, ज्वारी मध्ये ही 72 gm,बाजरी मध्ये 75 gm इतकी आहे.
त्याच बरोबर प्रोटिन्स ची मात्रा 100 ग्रॅम गव्हामध्ये 13 gm,ज्वारी मध्ये 11gm बाजरी मध्ये 11gm अशी आहे.
एकत्रित ऊर्जा म्हणजे कॅलरी चा विचार केला तर 100 ग्रॅम गहू -340 cal ऊर्जा देतो, ज्वारी-329 cal , आणि बाजरी-382 cal एवढी ऊर्जा देते.
यावरून आपणास लक्षात आले असेल की ही तीनही तृणधान्ये अन्न घटक आणि कॅलरी च्या बाबतीत सारखीच आहेत, त्यामुळे एक धान्य दुसऱ्यापेक्षा श्रेष्ठ आहे असं निष्कर्ष काढला जाऊ नये.
- Glycemic index
Glycemic index(GI)- म्हणजे आपण कोणताही पदार्थ खाल्ल्यानंतर उर्जामध्ये मध्ये किती पटकन convert होतो याला glycemic index म्हणतात,जितका जास्त GI तितके लवकर blood sugar(glucose) वाढते.
- चपाती भाकरी चा GI आणि blood glucose वर परिणाम
गव्हाचा GI -54, ज्वारी 62,बाजरी-54 आहे,म्हणजेच glycemic index मध्येही ही तृणधान्य बऱ्यापैकी सारखी आहेत, यामध्ये फारसा मोठं अंतर नाही, त्यामुळे चपाती खाल्ल्यामुळे तुमची ब्लड ग्लुकोज लक्षणीय पद्धतीने वाढते असं म्हणणं योग्य ठरणार नाही.
Glycemic index हा त्या पदार्थाचा असतो म्हणजे फक्त चपातीचा,फक्त भाकरीचा असतो आणि तुम्हीच विचार करा ,या आधी आपण फक्त चपाती किंवा फक्त भाकरी केव्हा खाल्ली होती,याच उत्तर साहजिकच नाही हेच असेल.
आपण नेहमी पालेभाजी,डाळ ,सुकी भाजी, पातळ भाजी बरोबर चपाती,भाकरीचा वापर करतो, फक्त चपाती किंवा भाकरी आपण खात नाही,आणि ज्यावेळेस आपण चपाती भाकरी भाजी अशा पद्धतीने जेवतो त्यावेळेस पदार्थाचा glycemic index आहे त्या पेक्षा कमी होतो.
- गव्हाची चपाती आणि Gluten
गव्हामध्ये ग्लूटेन नावाचा एक प्रोटीन असते ज्यामुळे गव्हाच्या कणकेला लवचिकता येते ,या ग्लूटेन मुळेच गहू बेकरी प्रॉडक्ट बनवण्यासाठी वापरला जातो,बाकीच्या तृणधान्यात ग्लूटेन नसते.
पण काही फूड प्रॉडक्ट तयार करणाऱ्या कंपन्यांच्या जाहिराती मधून गव्हातील ग्लूटेन हे वजन वाढीचा कारण आहे असं सांगितलं जातं आहे, आणि अशा प्रकारचे Recommendation डॉक्टर ही आपल्या patient ला करतात, उदा:वजन कमी करायचं असेल,diabetes असेल तर चपाती बंद करा अशा उपदेशामुळे लोकांच्या मनात प्रश्न उपस्थित झाले की is bhakari good for weight loss, किंवा bhakri for weight loss पण कोणत्याही संशोधनामध्ये ठोसपणे सिद्ध करण्यात आलं नाही की गव्हामधील ग्लूटेन मुळे वजन वाढते,किंवा डायबेटिस होतो.त्यामुळे गव्हांमुळे वजन वाढते असं म्हणणं पूर्णतः चुकीच आहे.
- गव्हाची चपाती कोणता व्यक्ती खाऊ शकत नाही
गव्हांमुळे पूर्ण जगात फक्त एकच समस्या येते ती म्हणजे celiac disease,आणि हा disease खूप अभावाने पाहायला भेटतो,भारतामध्ये 1 टक्के पेक्षा कमी लोकांना हा होतो असा अंदाज आहे, जे लोक गव्हातील gluten साठी संवेदनशील असतात त्यांना ही व्याधी होते.
काय आहे celiac disease-गव्हातील ग्लूटेन मुळे काहींना अतिसार, थकवा, पोट फुगणे, शरीरात रक्तची कमतरता, हाडे ठिसूळ होणे अशी लक्षण दिसतात,आणि गव्हांमुळे अशी लक्षण असणारे लोक जगात आणि भारतात खूप कमी आहेत.
आपण लहान पणापासून गहू खात असाल आणि वरील कोणतीही लक्षण तुम्हाला निदर्शनास आली नसतील तर तुम्हाला आणि त्याचबरोबर 99.5 टक्के लोकांना गव्हाला आणि gulten ला घाबरण्याची काहीही गरज नाही.
- Conclusion
वरील चर्चेवरून आपल्याला समजलं असेल की chapati or bhakri यामध्ये फारस अंतर नाही. आणि मधुमेह साठी which one is better chapati or bhakri असा प्रश्न च उरत नाही ,शेवटी तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही खाऊ शकता,आपल्या भागात जे वर्षानुवर्ष पिकत आहे ते आपण खाल्लं पाहिजे,त्याच बरोबर महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कोपऱ्यात जी तृणधान्य पिकवली जातात ते पण खाल्लं पाहिजे शेवटी आपली आवड,चव, उपलब्धता या वर सगळं अवलंबून आहे.
महत्त्वाचं म्हणजे मधुमेह नियंत्रणात ठेवणे किंवा होऊ न देणे यासाठी आपली जीवनशैली कशी आहे या वर लक्ष दिलं पाहिजे, चांगला आहार ,चांगला आणि पुरेसा व्यायाम ,ताण-तणाव पासून दूर राहणे, आनंदी जीवन जगणे ही चांगल्या जीवन शैली ची लक्षण आहेत आणि असंच जीवन जगलही पाहिजे.मग फरक पडत नाही की तुम्ही चपाती खात आहे का भाकरी.
वरील चर्चा वरून chapati or bhakri for diabetes बद्दल च्या सर्व शंका च निरसन झालं असेल,आपल्याला हा लेख कसा वाटला हे कंमेंट करून नक्की सांगा, ज्यांना या माहिती चा उपयोग होईल अशांना whatsapp telegram च्या माध्यमातून share करा,आणि sense the nonsense या Youtube channel ला ही subscribe करा.
धन्यवाद.
0 टिप्पण्या
If You Have Any Doubt,Please Let Me know