स्वागत तोडकर बोगस डॉक्टर 2020|swagat todkar bogus doctor|swagat todkar fake doctor TONO 16


 उत्कृष्ट संभाषण शैली,लोकांशी लवकर मिळते-जुळते करून घेणे आणि व्याख्यानांमध्ये केले जाणारे विनोद यामुळे स्वागत तोडकर हे सामान्य जनतेला अगदी जवळचे वाटतात, पण या डॉक्टरांविषयी काही माहिती लोकांनी माहीत करून घेणे गरजेचे आहे, या लेखामध्ये आपण त्यांच्यावर केले जाणारे आरोप आणि या आरोप मध्ये किती तथ्य आहे याविषयी बोलणार आहोत.चला प्रमुख सुरू करूया,


स्वयंघोषित डॉक्टर स्वागत तोडकर हे "हसत खेळत आरोग्यविषयक घरगुती उपचार "या व्याख्यानाच्या माध्यमातून प्रकाशामध्ये आले. २०१७ मध्ये अशाच एका ठिकाणी व्याख्यांनाला गेल्यानंतर, ते असं म्हणाले की "साम टीव्ही वरील साम संजीवनी कार्यक्रम चे मालक ते स्वतः आहेत "यावर त्यांना साम टीव्ही ने विचारल्यानंतर त्यांनी या बद्दल जाहीर माफी मागितली, त्याच वर्षी कोल्हापूर जिल्हा आरोग्य विभाग ने केलेल्या सर्वेक्षणानंतर असं निदर्शनास आलं की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 239 बोगस डॉक्टर कार्यरत आहेत. यामधील काही डॉक्‍टरांवर गुन्हा दाखल केला होता .त्यामध्ये स्वागत तोडकर यांचाही समावेश होता. या प्रकरणावर आपली बाजू मांडण्यासाठी एका पत्रकार परिषदेमध्ये ते आपली निसर्गोपचार तज्ञ ची पदवी लोकांसमोर दाखवतात आणि शासन अध्यादेशाप्रमाणे ज्यांनी निसर्गोपचार तज्ञ ही पदवी घेतली आहे त्यांना डॉक्टर ही उपाधी लावण्याचा अधिकार आहे. असं ते म्हणाले. या प्रकरणावर महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन च्या आदेशावरून कोल्हापूरमध्ये राजवाडा पोलिस स्टेशन येथे स्वागत तोडकर यांचे विरुद्ध गुन्हा दाखल केला गेला.


स्वागत तोडकर हे त्यांच्या नावापुढे MD मनोविकार तज्ञ,NLP, ND या पदवी जरी लावत असले तरी ते या पदवी वैद्यकीय अधिकारी यांच्यासमोर दाखवू शकले नाहीत. 2019 मध्ये त्यांच्या बोगस पदवी चा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित केल्यानंतर, महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन चे अध्यक्ष डॉक्टर आशुतोष गुप्ता म्हणतात की "स्वागत तोडकर बोगस डॉक्टर आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल असून कोल्हापूर येथे अटक ही झाली होती .हे सर्व प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि त्यांना कोणतीही पदवी नावापुढे लावता येणार नाही जी त्यांनी कधीच धारण केली नाही", यानंतर संगमनेर व पुणे या दोन्ही ठिकाणी या डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिले . पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे येथे गुन्हा दाखल झाला आहे.


कोरोना सारख्या महामारी च्या परिस्थितीमध्ये शास्त्रज्ञ,वैद्यकीय अधिकारी ,सरकार लोकांचा जीव वाचविण्यासाठी धडपड करत असताना सामान्य जनतेच्या अज्ञानाचा आणि भीतीचा फायदा घेण्यासाठी TONO 16 हे औषध बाजारामध्ये प्रसिद्ध केले या औषधाबद्दल असे दावे केले," की कोरणा होऊच नये यासाठी औषध तयार केलं आहे ,या औषध घेतल्या नंतर दहा ते पंधरा मिनिटांमध्ये प्रतिकारक्षमता अनेक पटीने वाढेल, या औषधा नंतर कोणत्याही प्रकारचा विषाणूजन्य संसर्गरोग होणार नाही" याची खात्रीही दिली यावर संगमनेरचे प्रशासन खडबडून जागं झालं. आणि संगमनेर तालुका आरोग्य अधिकारी यांनी स्वागत तोडकर वर महाराष्ट्र वैद्यकीय अधिनियम आणि महाराष्ट्र जादूटोणा अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. यानंतर पुणे महानगरपालिकेने सुद्धा पोलीस आयुक्तालय ला आदेश दिला की स्वागत तोडकर वर लोकांची दिशाभूल करणे,औषधाची आक्षेपार्ह जाहिरात या अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची आदेश दिले.


कोरोना परिस्थिती मध्ये स्वतःचा आर्थिक फायदा बघून काही महिन्यापूर्वी एका व्याख्यानांमध्ये ते म्हणाले की "वेखंड या वनस्पतीचा उपयोग केला तर कोणालाही आयुष्यात कोरोना होणार नाही" अशा प्रकारच्या वक्तव्यावर महाराष्ट्रातील वैद्यकीय अधिकारी यांचे स्पष्ट मत आहे की "कोरोना मध्ये फक्त सरकारी सूचनांचं पालन करावं ,आज पर्यंत कॉरोनावर कोणताही एक वैद्यकीय उपचार पद्धती नाही, यावर एकच खात्री ने कार्य करू शकेल ती म्हणजे लस आणि अशा प्रकारचे दावे कोणीही करू नये आणि केले जाऊ नये. पण या औषधाची यूट्यूब च्या माध्यमातून एवढी प्रसिद्धी झाली आहे की लोकांना फरक पडत नाही की त्या औषधावर बंदी आली आणि अनेक जणांना माहिती ही नसेल की स्वागत तोडकर यांच्या औषधांवर बंदी आली आहे.


आज पर्यंत स्वागत तोडकर वर महाराष्ट्रातील तीन ठिकाणी गुन्ह्याची नोंद झाली आहे ,ते आहेत कोल्हापूर ,पुणे ,संगमनेर. यांच्यावर गुन्हा नोंद झाला असला तरी यांची प्रसिद्धी काही कमी झाली नाही. यावरून आपल्याला समजते की योग्य गोष्ट लोकांपर्यंत पोचण्यासाठी वेळ घेते आणि चुकीच्या गोष्टी लोकांना मध्ये लवकर पसरतात,लोकांना विनंती आहे आपण कोणतीही गोष्ट वापरण्याच्या आधी त्याबद्दल थोडीशी चिकित्सा करणे गरजेचे आहे कोणाचाही बोलल्यावर विश्वास न ठेवता आपल्या विवेक बुद्धीचा वापर करावा आणि त्यानंतर निर्णय घ्यावा, समाजामध्ये लोकांना मूर्ख करणाऱ्या व्यक्तींची कमी नाही अशाच प्रकारे अनेक लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना रोज मूर्ख बनवत आहेत. या सगळ्यासाठी आपण स्वतः जागृत होणे गरजेचे आहे नाही तर रोज अशाच प्रकारचे स्वागत तोडकर रोज तयार आहोत राहतील.


एकंदरीत काय तर स्वागत तोडकर बोगस डॉक्टर आहेत त्यांच्याकडे वैद्यकीय पदवी नाही, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल संलग्न नाहीत आणि अनेक प्रकारचे गंभीर आरोप करून सुद्धा त्यांनी त्यांचे हे लोकांना मूर्ख बनवण्याचे धंदे ,दवाखाने बंद केलेले नाहीत आणि याचा उद्देश फक्त आर्थिक फायदा कमी होणे हाच दिसतो आहे. प्रशासनाला विनंती करतो की स्वागत तोडकर वर योग्य ती कारवाई लवकरात लवकर केली जावी आणि त्यांच्या सोशल मीडियाच्या उपचारांवर सुद्धा निगराणी ठेवावी जेणेकरून लोकांची फसवणूक होणार नाही.

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

  1. आता मिळवा मोफत महाराष्ट्रातील व भारतातील सरकारी व खासगी नौकरी ची माहिती मोफत अधिक माहिती साठी भेट द्या.
    Naukri Kendra | नौकरी केंद्र

    उत्तर द्याहटवा

If You Have Any Doubt,Please Let Me know