Kiat Jud Dai Workout काय आहे? | Viral Weight loss Dance Workout | Janny14906 Viral Weight Loss Dance | Janny14906

Kiat Jud Dai Workout

Weight Loss dance Workout 


वजन कमी करणाऱ्यांना आपलं वजन झटपट कमी व्हाव अशी अपेक्षा असते. त्यांच्यासाठी नवनवीन Diets आणि Workout येत असतात असाच एक नवीन Trend आहे Kiat Jud Dai Workout, हा एक Dance Workout आहे. बघुयात हा Viral Weight Loss Dance Workout किती कारगर आहे?

हा Viral Weight Loss Dance Workout ज्या गाण्यांमुळे प्रसिद्ध झाला त्याच नाव आहे Kiat Jud Dai यावरून च या Dance Workout ला Kiat Jud Dai Workout असंही म्हणतात.


Kiat Jud Dai Workout also known as Tiktok Viral Weight loss Dance Workout
*Janny14906 Tiktok Belly Dance Workoutकोणी हा Viral Weight loss Dance Workout सुरू केला? / Who Started Kiat Jud Dai Workout?

हा Weight Loss Dance Workout प्रसिद्धीस आणण्याचं काम Janney (कोरियन महिला) यांनी केल आहे .त्यांचं Tiktok वर Janny14906 या नावाने Account आहे. गेल्या काही महिन्यांपासून Weight Loss Dance चे Video Upload करत आहेत. भारतात TikTok Ban असले तरीही Kiat Jud Dai Workout प्रसिद्ध होण्यास जास्त वेळ लागला नाही. आज Instagram, Reels, YouTube वर अश्या विडिओ ची भरमर आहे.


काय आहे weight loss Dance Workout (Kiat Jud Dai Workout).

 • या Weight Loss Dance Workout मध्ये कंबर आणि पोटाची अशी Movement केली जाते जेणेकरून पोटांच्या स्नायूं वर ताण येईल. Kiat Jud Dai Workout 5 ते 10 मिनिटे असे दिवसातून 2 वेळा करायचा आहे. (सकाळी नाष्टा पूर्वी आणि रात्री जेवणानंतर).
 • Janny यांनी दावा केला आहे की हा Weight Loss Dance Workout पोटाच्या स्नायूंवर (ABs-Abdominal Muscle) काम करत असल्यामुळे फक्त पोटावरची चरबी कमी होऊन वजन कमी होण्याला मदत होते.


Viral Weight Loss Dance Workout वजन कमी करण्यासाठी काम करतो का? / Does Kiat Jud Dai Workout Works ?

 • Spot Reduction - अनेकांचा समज असतो की ठरवून एका Body Part चा व्यायाम केला तर त्या ठिकाणची चरबी कमी होते याला Spot Reduction म्हणतात उदा. पोटावरील चरबी कमी करण्यासाठी Sit-ups, मांडी वरील चरबी कमी करण्यासाठी Squats Workout केले जातात.
 • अनेक शास्त्रीय संशोधनातून सिद्ध झालं आहे की Spot Reduction हे कधीही होत नाही. आपण ठरवून एका Body Part वरून चरबी कमी करू शकत नाही. चरबी कमी झाली तर ती पूर्ण Body वरून कमी होते, एक ठिकाणाहून ती कधीही कमी होत नाही.
 • Janny जो Kiat Jud Dai Workout करायला सांगतात तो फक्त पोटांच्या स्नायू (abdominal Workout) वर काम करतो. या Weight Loss Dance Workout मुळे शरीरातील काही Calories नक्की Burn होतील पण या Workout मुळे फक्त पोटावरची चरबी कमी होईल हा फक्त एक गैरसमज आहे.

वजन कसे कमी करावे?/ How To Lose Weight?

 • वजन कमी करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाच सूत्र म्हणजे Calories Deficit, त्याचबरोबर व्यायाम, संतुलित आहार, शांत झोप आणि कमी तणाव.
 • आपण चांगला व्यायाम करत असाल आणि त्याप्रमाणात संतुलित आहार नसेल किंवा CaloriesDeficit मध्ये नसाल तर Weight Loss Result अपेक्षेप्रमाणे भेटणार नाही.
 • Janny यांचा Weight Loss Dance Workout च्या ऐवजी संपूर्ण शरीराचा व्यायाम (Strength Training,Yoga, Body Weight Training,Walking) केला तर जास्त Calories Burn होतील आणि वजन कमी होण्यास मदत होईल.

Conclusion.

 • Kiat Jud Dai Workout हा फक्त पोटावरील चरबी कमी करेल हे शास्त्रीय दृष्ट्या शक्य नाही. Viral Weight Loss Dance Workout काही प्रमाणात Calories Burn करतील पण यामुळे पोटावरची चरबी कमी होईल हे पूर्णतः चुकीचं आहे.
 • Spot Reduction हे कधीही होत नाही, आपल्या शरीरातून कुठून चरबी कमी करायची हे आपण ठरवू शकत नाही, चरबी Overall Body वरून कमी होते, एक ठिकाणाहून ठरवून ती कमी करता येत नाही.
 • Kiat Jud Dai Workout एक Fad Workout आहे. वजन कमी करण्यासाठी संपुर्ण शरीराचा व्यायाम, संतुलित आहार, Calories Deficit, शांत झोप यांची चतुसूत्री ची जागा Weight loss Dance Workout कधीही घेऊ शकत नाही.

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

If You Have Any Doubt,Please Let Me know